हे सर्व काल्पनिक आहे. माझ्या आयुष्यातील स्त्रियांनी ( म्हणजे आई, सासूबाई, सौ., मावश्या, आत्या, काकू, ताया , वहिन्या आणि इतर सर्व मैत्रिणी यांनी कृपया गैरसमज करून घेऊ नये, ही नम्र विनंती)
माझ्या आयुष्यातील खंबीर स्त्रिया
सर्वच स्त्रिया अत्यंत खंबीर मनाच्या असतात. परिस्थिती कितीही बिकट, नाजूक, तणावपूर्ण, लोभाची प्रलोभने दाखवणारी असोत, स्त्रिया काही आपला खंबीरपणा सोडत नाहीत...माझ्या आयुष्यात आलेली ही खंबीर स्त्रियांची उदाहरणे. या स्त्रियांनी माझे आयुष्य अत्यंत खडतर बनवून मला जीवनाचा कडवटपणा चाखायला शिकवला, त्यामुळे नंतर जीवन खूप गोड झाले. कच्चं कारल चावून खाऊन मग साखरेची एक चिमूट तोंडात टाकून बघा, साखर आणि गोड लागते. असो, विषयांतर नको..
१) मातोश्री : घरात पाहुणे आले की त्यांच्याकडून अजिबात लाड करून घ्यायचे नाहीत, चॉकलेट मागायचे नाही, त्यांना छान छान कविता आणि स्तोत्र म्हणून दाखवायची हा खंबीरपणा त्यांनी दाखवला, म्हणून आज मी इथे वाचकांकडून वाचनाची वा समीक्षेची बिलकुल अपेक्षा न धरता , छान छान उद्बोधक असं सगळं लिहू शकतो....
२) बाई : माझी बोटं दुखली तरी हरकत नाही, पण शुद्धलेखनात एक चूक झाली तर तो शब्द पन्नास वेळा लिहायचा , या बाईंनी दाखवलेल्या खंबीरपणामुळे माझ्या लिखानात सहसा एकही शुद्धलेखनाची चूक होत नाही. आणि समजा झालीच, तर मी दुरुस्त करतो..
(लिखाणात,लिखाणात,लिखाणात,लिखाणात,लिखाणात,लिखाणात,लिखाणात,लिखाणात,लिखाणात,लिखाणात,लिखाणात,लिखाणात,लिखाणात,लिखाणात,लिखाणात,लिखाणात,लिखाणात,लिखाणात,लिखाणात,लिखाणात,लिखाणात,लिखाणात,लिखाणात,लिखाणात,लिखाणात,लिखाणात,लिखाणात,लिखाणात,लिखाणात,लिखाणात,लिखाणात,लिखाणात,लिखाणात,लिखाणात,लिखाणात,लिखाणात,लिखाणात,लिखाणात,लिखाणात,लिखाणात,लिखाणात,लिखाणात,लिखाणात,लिखाणात,लिखाणात,लिखाणात, लिखाणात,लिखाणात,लिखाणात,लिखाणात)
३) ताई : बाबांनी जर दोन वस्तू आणल्या तर प्रत्येक वेळी चांगली गोष्ट स्वतःला ठेवून घेण्याचा खंबीरपणा ताईने दाखवला, त्यामुळे मला असेल त्यात समाधान मानायची अत्यंत अध्यात्मिक सवय लागली.
४) आधीची ती : इतक्या कविता केल्या , पण तिने त्या वाचून तिला काहीच न कळल्याचा जो खंबीरपणा दाखवला , त्यामुळे आज माझ्या जीवनात आत्ताची ही आहे..तिच्याचमुळे ये नही तो वो सही, ही शिकवण मी अमलात आणू शकलो
५) आत्ताची ही: काहीही झालं तरी चार तास साडीच्या दुकानातून बाहेर पडायचे नाही, पहिलीच आवडली असली तरी, या खंबीरपणामुळे मी स्थितप्रज्ञ राहू शकतो. तसेच, नाही म्हणजे नाही, या खंबीरपणाने मला काय काय शिकवले हे मी शब्दात सांगू शकत नाही...
६) हिची ती : सारखी सुटलेली ती सासूमाऊली, सासुरवाडीत आल्यावर अत्यंत खंबीररपणे माझ्या हिच्याविषयी तक्रारी फक्त ऐकून घेते, हिला सांगत, ओरडत काहीच नाही. त्यामुळे मला मराठीतल्या कित्तेक म्हणींचा अर्थ कळला , "बोलल्यापेक्षा केलेले बरे, डोके आपटून मेलेले बरे" , "पालथ्या घड्यावर पाणी", "नावडतीचे मीठ अळणी"...असो...
अश्या या कौसल्या, सरस्वती, लक्ष्मी, पार्वती, दुर्गा आणि माऊली रूपातील खंबीर स्त्रियांना माझा सा. न. 🙏
खुप छान मजा ali वाचायला
ReplyDeleteआलिया भोगासी
ReplyDelete