आईने अगदी लहानपणी "वाचशील तरच वाचशील" हे मला फक्त सांगितले नाही, तर ते माझ्या अगदी डोक्यावर बसून , वेळप्रसंगी पोळी आणि लाडू देऊन ( चापट आणि धम्मक स्वरूपातले) , माझ्या गळी उतरवले..तिच्या लहानपणी तिच्या कोकणातल्या खेडेगावात तिला इतकी साधने उपलब्ध नव्हती. आम्ही कोल्हापूरला होतो, आणि तिथल्या अंबाबाईच्या देवळापेक्षा मला लहानपणापासून आईने भास्करराव जाधव वाचन मंदिराची गोडी लावली. वर्षाचे वीस किंवा त्याहून थोडे कमी जास्त वर्गणी असेल. तिथल्या बालसाहित्य विभागात मी पहिल्यांदा पाऊल टाकले, चौथीत असेंन, आणि त्या दिवसापासून आठवड्यातून एकदा पुस्तक बदलायचा नियम असताना, मी आरामात तीन चार पुस्तके आठवड्याला बदलायचो..
तिथे मला ती काकू भेटली....आमची लायब्ररी काकू....
आपल्याला हवं ते पुस्तक मिळालं नाही तर काकुला सांगून ठेवायचं. पुढच्या वेळी गेलं की ते पुस्तक मिळणारचं..काकूने तेजसला पाहिजे वाचायला म्हणून बाजूला ठेवलेलं असायचं.
मला माहित नसलेलं एक पुस्तक असेल आणि काकूंना त्या बद्दल चांगली प्रतिक्रिया मिळाली तर मुद्दाम मला द्यायच्या, आज हे घेऊन जा. मला माझं ठरवलेलं पुस्तक हवं असेल तर ते नेमकं त्या दिवशी गायब व्हायचं आणि मला काकूने काढलेलं पुस्तक घेऊन यायला लागायचं...नवीन आलेल्या पुस्तकाऐवजी "फुलाचा प्रयोग" हातात दिलं जायचं. आणि मला पांडुरंग सदाशिव साने गुरुजी सापडायचे....मी आज काय घेऊन गेलोय ते माहीत असल्याने उद्या आल्यावर त्याचाच दुसरा भाग हातात यायचा....पुलंच पूर्वरंग झालं, लगेच अपूर्वाई हातात.....काही दिवसांनी 'एका कोळियाने" म्हणत वेगळे पुल दिसायचे...
दहावी नंतर वाचनालय थोडं कमी झालं, आणि कधी या काकूंना भेटलो नाही, पण आज अचानक या विषयावर लिहिताना काकू आठवल्या आणि आपण किती कृतघ्न आहोत असं वाटलं...आता इतक्या दिवसानी आठवण तर झाली, आणि लिहिणं थोडं थांबवून डोळे पुसले, मनोमन काकूंना नमस्कार केला 🙏🙏
छान..some inconspicuous people leave a lasting impact on your life
ReplyDeleteखूप छान लिहील आहेस. ईतक्या आठवणीने पुस्तकें बाजुला काढुन ठेवणें एवढेंच नव्हें तर विद्यार्थ्याचे सध्या कुठले वाचन चालु आहे त्याप्रमाणें पुस्तकें बाजुला काढुन ठेवणें अशा या काकुंना सलाम.
ReplyDeleteचापट पोळ्या आणि धम्मक लाडू... सुंदर...
ReplyDeleteबालपणीचे दिवस सुखाचे अन आनंदाचे !
ReplyDelete👌👌🙏🙏
ReplyDeleteहे झूम कॉलच्या युगात दिसत नाही... WhatsApp वरील URLs वाचणे...आणि वाचनालयात जाऊन पुस्तकं आणून वाचणे यातील फरक शब्दात नाही मांडता येणार!
ReplyDeleteKhup Chan..... MI suddha college madhe Astana khup pustake vachali..... Tyat Suhas shirvalkar yanchi pustake mala khup aavdaychi. faster fene ... Feluda, ani bokya satbande hi tar MI atta vachli.... Maze June divas athavle..... Kakuche aabhar.... Karan tejasne blog tyamule lihayla suru kelay.......
ReplyDeleteSame here Tejas, मला न्यू कॉलेजमध्ये असताना लायब्ररीयन तर म्हणायच्या की एवढी पुस्तकं वाचतेस मग अभ्यास कधी करतेस
ReplyDelete