मराठी भाषा गौरव दिन - चिमुकला प्रयत्न - मोठे यश

माझी एक मैत्रीण दररोज व्हाट्सअँप वर स्टेटस ठेवते. कधी वपुंच्या दोन ओळी, तर कधी आणि कुणाच्या. तिचे ते स्टेटस बघून मला सारखा विचार यायचा की हा स्टेटस ठेवत असेल ती असे? म्हणजे आपल्याला काही आवडलं तर हरकत अजिबात नाही ते ठेवायला, पण मला माहीती होतं कि ह्या ओळी किंवा काव्यपंक्ती किंवा शेर जे काही ती स्टेटस ला ठेवत होती, ते तिने हल्लीच वाचलेलं नाहीये. शाळेत किंवा कॉलेजात असताना तिने हे वाचले असणार. मग हेच परत का ठेवतीये? कळत नव्हतं काही. पण मुद्दाम कधी विचारलं सुद्धा नव्हतं तिला.

आज, म्हणजे आजच, मराठी भाषा गौरव दिनाच्या दिवशी, तिने एका कविता स्पर्धेचा स्टेटस ठेवला, आणि ती स्पर्धा खुली आहे का फक्त ठराविक समूहासाठी हे विचारण्यासाठी फोन केला. त्या स्पर्धेविषयी बोलून झाल्यावर तिने सहजच सांगितलं, "आज मराठी भाषा गौरव दिन, आणि आज मला समाधान आहे कि माझ्यामुळे कुणाच्याततरी मराठी वाचनाची गोडी निर्माण झालीये". मी विचारलं, "कस काय?". तेव्हा तिने सांगितलं,

"मी दररोज व्हाट्सअँप वर जे स्टेटस ठेवते, ते माझ्या काही विद्यार्थिनी वाचत होत्या. एक दिवस त्यातील एकीने विचारले, 'म्याडम, तुम्हाला साहित्याची आवड आहे का? तुमचे स्टेटस पाहून, त्यातील वाक्य वाचून, आम्हालाही वाचनाची आवड लागली. तुम्ही ज्या पुस्तकातल्या ओळी ठेवता, ती पुस्तके आम्ही मिळवून वाचतो.' हे ऐकून मला खूपच भारी वाटतंय"

ती भारावून बोलत होती आणि मीही ऐकत होतो एक नवीन काहीतरी गवसल्यासारखं. इतके दिवस लोक स्टेटस का ठेवतात ? या मला पडलेल्या प्रश्नाच एक समाधानकारक उत्तर देऊन गेली ती.

प्रयत्न छोटे किंवा मोठे कधीच नसतात. एकतर ते केले जातात किंवा केले जात नाहीत. रोहिणीच्या या उपक्रमाने काही जणांमध्ये वाचनाची आवड निर्माण झाली, हेच खूप अनमोल आहे.

Comments

  1. एक छोटंसं बीज रुजवण्याचा प्रयत्न खूप समाधान देऊन जातो..

    ReplyDelete
  2. खुप छान कल्पना,इतरांना वाचण्यास प्रोत्साहित करणारी.... आवश्यक च आहे .... मराठी नुसते बोलून ऊप्योग नाही तर तिची समृध्दी नवीन पिढीस मार्गदर्शक तरी शकते.....उन्हाळ्याच्या सुट्टीत पुर्वी साहित्य ,कथा प्रबोधनपर पुस्तके आणली जायची व मुलांना वाचण्यासाठी दिली जायची !!!
    आपण जे विसरलो ते परत सुरू केले पाहिजे...
    दोघांना मराठीत खुप शुभेछा
    शिरीष

    ReplyDelete
  3. खुप खुप छान, मराठीचा अटकेपार झेंडा फडकत आहे🙏🙏🙏🙏🙏🙏🙏✍✍✍

    ReplyDelete

Post a Comment