सासुशी गट्टी : सासूचे बिल

नमस्कार मंडळी,

बऱ्याच दिवसांनी भेटीला आलोय. कारण म्हणजे सासुचा एक नवीन कारनामा माहीत पडला. त्याची माहिती तुम्हाला सर्वांना व्हावी म्हणून आज अंगठे कीबोर्डला लावलेत.

तर त्याच काय झालं, दामिनी हल्ली तिच्या कामात खूप व्यस्त होती. कामाच्या गडबडीत तिची गेल्या महिन्याची सगळी बिले भरायची राहिली होती. आणि अशातच तिला एक मेसेज आला. "तुमचे गेल्या महिन्याचे  वीजबिल बाकी आहे. खालील मेसेज वर क्लिक करून बिल भरा. अन्यथा वीज तोडली जाईल". 

घरी असलेले आई-बाबा,  वीज गेली तर त्यांना होणारा त्रास याचा विचार करून दामिनीने ऑफिस मधून आपल्या फोन वरून त्या मेसेज मधली लिंक उघडली. त्या लिंक मधून वीज कंपनीच्या ॲप सारखे दिसणारे एक ॲप डाऊनलोड झाले, आणि त्यातून दामिनीला आपले बाकी असलेले वीज बिल दिसले.

तेवढ्यात तिला एक कॉल आला. वीज कंपनीतून बोलतोय असे सांगून तिला payment ऑप्शन विचारले. नेटबँकिंगला लॉगिन करून तिला आधी फक्त १ रुपयाचे बील भरायला सांगितले गेले. ते बिल भरत असताना तिला एक आणखी मेसेज आला. तो दहा हजार रुपयांच्या transaction चा होता, आणि त्यात एक OTP होती. तिने तो OTP कुणालाही सांगितला नाही , तरीही तिच्या अकाउंट मधून पैसे डेबिट पडले.

तिने OTP न सांगताच तिचे पैसे कसे गेले? आणि ते transaction कसे झाले?

तिने जे ॲप डाऊनलोड करून घेतलं होत ते एका हॅकर ने तयार केलेलं ॲप होत. ते ॲप चालू केलं की आपली स्क्रीन हॅकर ला दिसत होती, आणि आपण जे टाईप करतोय ते ही कळत होत. (Key logger + screen share). त्यामुळे तिने १ रुपयाचं transaction करताना तिची स्क्रीन शेअर असल्याने समोरच्याला तिची युजर आयडी पासवर्ड दिसले होते. आणि दहा हजार चां मेसेज फक्त वाचला त्यावेळी तो मेसेज (आणि त्यातला OTP) समोरच्यालाही दिसला होता. 

असे प्रकार आपल्या बाबतीत होऊ नयेत म्हणून आपण काय करू शकतो .

१) बील भरण्यासाठी कुणी फोन वगैरे केला, आणि मेसेज वगैरे पाठवून ॲप डाऊनलोड करायला सांगितले, तर करू नये.
२) आपल्या gpay, फोन pe वगैरे UPI ॲप वर बिल reminder लावता येतात, आणि त्यानुसार payment केले जाऊ शकते.

त्यामुळे, सावध रहा, सुखी रहा...आणि आधीचे भाग वाचले नसतील तर नक्की वाचा...🙏

Comments

  1. आमच्याकडे बिल भरले नाही की mseb वाले लगेच येतात त्यामुळे लक्षात नाही ठेवलं तर चालत

    ReplyDelete

Post a Comment