
बुद्धीबळाच्या पटावर एकदा,
जमले होते सगळे मोहरे
सांगत होते एकमेकांना
आपापल्या जागांचे नखरे
वजीर म्हणाला हॅट प्याद्या
जरा लांब जाऊन रहा
येशील वाकडा रस्त्यात माझ्या
सरळ गिळून टाकीन पहा
वजीर म्हणती मला पटाचा,
मनमानी मी संचार करी
सरळ, तिरके कितीही घरे,
द्रुतगती मी धडकी भरी
घोडा उभा राहिला लगेच,
वजिरा म्हणे अरे शहाण्या,
अडीच घरात आहेस उभा,
पळतोस का मारू दुगाण्या?
जरी मी चाले अडीचच घरे,
भीती माझी सगळ्यांना
उधळलो मी पटावरी मोकळा,
दुडक्या चाली पहा ना
उंट म्हणे मग घोड्याला,
मोडक्या, बाजू हो जरा
अडीच घरांची तुगडुक तुगडुक,
माझा जरा पहा तोरा
एका कोपऱ्यातून दुसरीकडे
पळभरातच मी जात असे
नसे कोणाचीच पर्वा मला
पांढरा काळ्यात जात नसे
हत्ती मारी उंटा चापटी,
तिरक्या, बाजू सरक जरा
सरळमार्गी नाहीस तू,
वाकड्या चालीचा तोरा
मी सत्ता गाजवितो पहा
उभ्या आडव्या रेषेत
जणू जखडतो सर्वांना
आपुल्या आपुल्या कोषात
भांडत बसले होते सगळे
प्यादे शांत पुढे चाले
पोचून दुसऱ्या टोकाला
सर्वां त्याने सांगितले
जागा असती आपापल्या,
आवडीच्या आणि हक्काच्या
घेऊ जाणुनी एकमेका,
सीमा रक्षू राज्याच्या
ऐकून आपल्या प्याद्याचे,
बोल उदात्त हे साचे
राजा होई समाधानी,
प्याद्या पद दे वजीराचे
Mast ����
ReplyDeleteसुरेख. वाचून एकदम चेक-मेट झालो.
ReplyDeleteछान
ReplyDeleteअप्रतिम कविता
ReplyDeleteसमर्पक शब्दात
अचूक वर्णन
जो चालत राही
न हटता मागे
वापरून बुद्धी
अन मन खंबीर
ईश्वर त्याला
साथ देई
बनवून प्याद्याचा
वजीर
मस्त,सुंदर......
ReplyDeleteलेखकापाठोपाठ कवीही बाहेर आला