असे बरेच जण असतात की जे आनंदाचे क्षण शोधत बसतात, किंवा त्यांची वाट बघत बसतात. पण आनंदाचे क्षण हे मिळवता सुदधा येतात बरं का...
ते मिळवण्यासाठी आपल्याला आपल्या मेंदूत असलेल्या अमीगड्ला (amygdala) ला थोडं उल्लू बनवावं लागतं..
(आता हे अमीगड्ला काय आहे ते तुम्ही गुगळेकाकुला विचारू शकता.. अलेक्साबाई असतील तर त्याही सांगतील, मी फक्त त्याला उल्लू बनवून आनंदाचे क्षण कसे मिळवायचे ते सांगणार आहे)
समजा तुम्हाला गुलाबाच्या फुलांचा वास आला की आनंद होतो. (आणि असं पण समजा की बाकी कश्याकश्यानही होत नाही). आता समजा काही दिवस नाही मिळाली तुम्हाला गुलाबाची फुलं, तर आनंदच नाही वाटणार ना कशात...मग बसणार का तुम्ही घुम्यासारखं ??
असं नको असेल तर एक सोप्पा उपाय करा. ज्यावेळी गुलाबाच्या फुलांचा प्रत्यक्षात वास घ्याल त्या त्या वेळी स्वतःला हळूच कुठल्याही जागेला चिमटा काढा ( स्वतःलाच बरं का...आणि एकच जागा ठरवा...)...
घेतला वास, काढला तिथं हळू चिमटा...
घेतला वास, काढला तिथं हळू चिमटा...
.
.
खूपदा अस करावं लागेल. व्यक्तिपरत्वे किती दिवस ते बदलू शकत, पण अंदाजे 30-40 वेळा तरी, आणि वेगवेगळ्या दिवशी....नाहीतर बसाल एक फूल घेऊन घेतला वास, काढला तिथं हळू चिमटा असं करत....ती जागा लाल होईल अशाने, बाकी काही नाही...म्हणून मुद्दाम न करता ज्यावेळेस सहज फूल मिळेल आणि वास घ्याल, त्यावेळी करा..
परत सांगतो, फूल उदाहरणासाठी आहे. तुम्हाला ज्या गोष्टीने आनंद होतो, त्यावेळी हळूच कोचून घ्या..लाडू खाल्यावर, ती दिसल्यावर वगैरे..
हे केल्याने तुमचा अमीगड्ला आनंदलहरी आणि चिमटा यांची सांगड घालू लागेल, आणि असं रेकॉर्ड करेल स्वतःकडे की आनंद चिमटा काढल्यावर होतो....हे झालं अमीगड्ला ला उल्लू बनवणं....
आता ज्यावेळेस तुम्हाला आनंदी व्हायचं असेल, आणि फूल, लाडू, ती यापैकी काही नसेल त्यावेळी काय कराल सांगा? ...
बरोब्बर, तिथेच हळूच चिमटा काढून घ्यायचा...बघा तुम्हाला आनंद मिळतो की नाही....
( लेख थोडा विनोदी अंगाने लिहिला असला तरी विषय खरा आहे. अधिक माहितीसाठी NLP ची माहिती घ्या)
NLP : Neuro-linguistic programming (NLP) is a psychological approach that involves analyzing strategies used by successful individuals and applying them to reach a personal goal. It relates thoughts, language, and patterns of behavior learned through experience to specific outcomes.

भारी च खूप आवडलं
ReplyDeleteAll is well... Maasta
ReplyDeleteमानसशास्त्रात याला साहचर्याचा सिध्दांत म्हणतात.
ReplyDelete