अगागागागागागा SSSSSSSSS, मोबाईल चावला,
काय मी करू ? मोबाईल चावला !
कुणाला सांगू ? मोबाईल चावला !
कुठं मी जाऊ ? मोबाईल चावला !
मोबाईल चावला.....
मोबाईल चावला...... मोबाईल चावला , हो ।।
या मोबाईलची महती,
माणसे एकमेका भोवती,
असतील हाकेवरती,
तरीही कॉलच करती.....
माणसाने माणसाच्या
मनातल्या माणसाला,
त्याच्या माणुसकीला
आणि त्याच्या चांगलेपणाला....
या मोबाईलमुळे खोलात गाडलंय
म्हणूनच म्हणतो,
अगागागागागागा SSSSSSSSS, मोबाईल चावला...।।
परी ऐकावे सज्जनहो,
याचे चालक आपणच हो,
तो त्याला वापरावे तसे करतो हो..
उगाच नका त्याला बसू चिवडीत
त्याची बटणे उगा दाबीत
किंवा त्याच्या चेहऱ्याला टोलवीत 👩💻...
मेसेज इकडून तिकडे टाकीत
वापर करा त्याचा जाणता
ज्ञानाच्या देवाणघेवाणी करीता
मग तो होईल आपला त्राता
अन्यथा टाईमपास पुरता
म्हणूनच म्हणतो,
अगागागागागागा SSSSSSSSS, मोबाईल चावला...।।
वापराल फक्त मनोरंजनाला
तर तो देईल निमंत्रण व्याधीला
मनाच्या अस्वस्थतेला आणि
एका अनामिक भीतीला.....
आला नाही मेसेज, मला भ्या वाटतंय,
रेंज गेली राव, मला भ्या वाटतंय,
उचलत नाही ती, मला भ्या वाटतंय,
अरे स्क्रीन फुटेल, मला भ्या वाटतंय
पोरगं कायबी बघेल, मला भ्या वाटतंय,
चार्जिंग का संपतंय , मला भ्या वाटतंय,
लागला का व्हायरस, मला भ्या वाटतंय
मेंदू बाद होईल, मला भ्या वाटतंय
मला ह्यांव वाटतंय, मला त्यांव वाटतंय,
मला भ्या वाटतंय, मला भ्या वाटतंय
म्हणूनच म्हणतो,
अगागागागागागा SSSSSSSSS, मोबाईल चावला...।।
काय मी करू ? मोबाईल चावला !
कुणाला सांगू ? मोबाईल चावला !
कुठं मी जाऊ ? मोबाईल चावला !
मोबाईल चावला.....
मोबाईल चावला...... मोबाईल चावला , हो ।।

लय म्हंजे लयच भारी तेजू महाराज!
ReplyDeleteवा छान भारूड तेजस
ReplyDeleteलय भारी
ReplyDelete