आपणा सर्वांना बुध्दीबळ (chess) माहीत असेलच.
त्या चौसष्ट घरांच्या खेळाने कित्येक जणांना भुरळ घातली आहे.
त्यातले राजे, वजीर, उंट, घोडे, हत्ती आणि प्यादी, सगळ्यांच्या तऱ्हा वेगळ्या, चाली वेगळ्या....
या खेळात डाव सुरू झाल्यावर विविध प्रकारच्या व्यूहरचना केल्या जातात, Queen's opening वगैरे.
माझ्या लहानपणी हे मला खूप बोरिंग वाटायचं, आणि मी धडधड मारामारी कधी चालू होईल ते बघायचो..
काही दिवसांपूर्वी बच्चेकंपनीला शिकवत असताना ते सगळे पण बोअर झाले आणि म्हणाले, "काका, पहिल्या मूव्ह पासून मारामारी, असं काही करता येईल का?"
त्यावेळी एक नवीन खेळ शोधला - अर्ध बुद्धीबळ..
अगदी पहिल्या मूव्ह पासून मारामारी...
बघा तुम्हाला आवडतोय का ?
बोर्ड अर्धा दुमडायचा, म्हणजे ३२ घर, आणि ३२ सोंगट्या..
पहिल्या रांगेत हत्ती, घोडा, उंट, राजा
दुसऱ्यात चार प्यादी
तिसऱ्यात हत्ती, घोडा, उंट, वजीर
चौथ्यात चार प्यादी ...

Interesting..😀
ReplyDeleteNice concept
ReplyDelete