प्रयोगाच्या सुरवातीला त्याने त्यांच्या शरीराच्या प्रत्येक भागातून नाणी काढून दाखवली. मला तर असं वाटलं की नाशिकच्या टाकसाळीत नेऊन ठेवावा याला, किती श्रीमंत होईल आपला देश.
त्यानंतर त्याने माझ्या एका मित्राच्या मुलाला पाणी पाजले, आणि ते त्याच्या पोटातून काढूनही दाखवले. मला वाटलं, आपण त्याला पोटातली चरबी अशीच पटकन काढता येईल का विचारलं पाहिजे...
अगदी दिवाना झालो होतो मी त्याच्या कलेचा. खुलेपणाने टाळ्या वाजवून त्याला दाद देत होतो. मी दाद देणे, स्तुती करणे यात खूप मोकळा ढाकळा आहे हे सर्वज्ञात आहेच...
मध्यंतर झालं, आणि मी अगदी न राहवून त्याला भेटायला कलादालनात गेलो. तो बिचारा शांतपणे लिंबूपाणी पीत होता. ते बाहेर काढून दाखवायला मी सांगेन की काय या भीतीने त्याने लिंबूपाण्याचा ग्लास लपवला. त्याच्याशी हस्तांदोलनासाठी हात पुढे केला, तर त्याने नम्रपणे हस्तांदोलन नाकरून नमस्कार केला. त्याच्या बाहीत काहीबाही दडलेलं होत ते मला माहित नव्हतं. त्या मध्यंतरात मी त्याच्याशी दोस्ती केली.
प्रयोग पुन्हा चालू झाला. एक दोन वेगळे नमुने दाखवून त्याने मुख्य आकर्षण असणाऱ्या खेळासाठी एक मोठ्ठ कपाट आणल. त्याला एक मोठ्ठ दार आणि एक मोठ्ठी कडी आणि एक मोठ्ठ कुलूप होतं. त्या मोठया कपाटाला योग्य म्हणून त्याने हिला स्टेज वर बोलावलं, कपाटात घातलं, कडी लावली, कुलूप लावलं... छू मंतर केलं, आणि काय आश्चर्य???
सगळं गायब,
मोठ्ठ कपाट,
मोठ्ठ दार,
मोठ्ठी कडी,
मोठ्ठ कुलूप आणि ....सगळंच
सगळे आश्चर्यचकित झाले होते, आणि मी ? ..अहो विचारता काय, घाबरलो होतो....
त्याने परत आणखी एक मंत्र म्हणाला, आणि सगळं दिसायला लागलं...त्याने कुलूप उघडलं, कडी काढली...इतक्यात मी जोरात ओरडलो...
थांब मित्रा थांब,
तुला या कोवळ्या मैत्रीची शपथ
दार उघडू नकोस ......
असं बोलत असतानाच पाठीत गुद्दा पडला..ही मागेच होती
☺️
सुपर.....
ReplyDelete