महिला दिनानिमित्त एक दीनाची विनंती

सर्वप्रथम इथल्या आणि जगातल्या तमाम महिलावर्गाची माफी मागून मी हे अत्यंत नम्रपणे आणि संकोचून मान्य करतो की आजपर्यंत "8-मार्च ला आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा का करतात?", याची माहिती मला नव्हती. पण उशीराने का होईना ते जाणवलं म्हणून आज थोडं इतिहासात डोकावून आलो आणि माहिती करून घेतली. आता मी सांगू शकेन की मला माहीत आहे हा दिवस साजरा करण्याचा इतिहास काय आहे. ते इथे लिहिण्यासाठी हा प्रपंच नाही. ती माहिती विकिपीडिया वर उपलब्ध आहेच. ज्यांना माहीत नसेल त्यांनी जरूर वाचा...

https://en.m.wikipedia.org/wiki/International_Women's_Day

हे वाचता वाचता मात्र एक जाणवलं. मुळात दिवस साजरे करण्याची पध्द्त ही कुठल्यातरी गोष्टीची आठवण म्हणून असते. स्वातंत्र्यदिन असो, शिवजन्म दिन असो किंवा आजचा हा महिला दिन असो. प्रत्येक दिवसाचे महत्व त्या दिवसापुरते नसावे, तर तो दिवस वर्षातून एकदा,  आपण विसरलो तर नाही ना, या स्व-जाणिवेसाठी असावा. शिवाजी महाराज असोत, गांधीजी असोत वा सावरकर, भारतमातेविषयी देशभक्ती असो वा महिलांविषयी आदर, किंवा अगदी आपल्या वेलेन्टाइन बद्दल प्रेम, हे नसानसात भिनल असलं पाहिजे. या एका दिवशी शुभेच्छा आणि नंतर विसरलो, असं नसलं पाहिजे

परवा महिला दिनाच्या निमित्ताने व्हाट्सऍप वा इतर सोशल मीडिया वर, भरपूर जोक्स येत होते, पुरुष लोकांनी आज काय केलं पाहिजे , आणि काय नको यावर भरपूर उहापोह झाला. पण त्यात "आज" होतं ते खटकलं. ते "कायम" पाहिजे, तरच ते खरं त्या दिवस पाळण्याच सार्थक झालं म्हणायचं.

आता या तात्विक चर्चेनंतर थोडी मजा. मला या जगातल्या तमाम सासवाना हे सांगायचंय, की आपापल्या सुनांना प्रेमाने वागवा. तमाम लग्नाळू मुलींना हे सांगायचंय की नवऱ्याच्या आई बाबांना अडचण (डस्टबिन) समजू नका. तमाम नणंदाना हे सांगायचंय की आपल्या भावजईना त्रास देऊ नका. तमाम विहिणींना हे सांगायचंय की आपल्या मुलीच्या सासरच्या किंवा सुनेच्या माहेरच्या आपल्या व्याही-विहिणींना छान मान द्या..

आता इथल्या माझ्या माय-भगिनी तर वरीलपैकी काहीही करत नसतीलच याची मला पुर्ण खात्री आहेच, कारण इथल्या सगळ्या खूप खूप छान आहेत. तरीही समाजात वरील गोष्टी मी खूप पाहिल्या आहेत, आणि त्या नाहीतच असेही कोणी म्हणू शकणार नाही. 😀

असो, मजा म्हणून घ्या, राग नको, लोभ असावा 💐💐

परत एकदा सगळ्यांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐


Comments