सकाळी भाजी आणायला बाहेर गेलो होतो. मी नक्की काहीतरी हमखास विसरतो म्हणून सौ ने स्वहस्ते एक यादी लिहून दिली होती.
त्या यादीत असलेले सर्व जिन्नस यथायोग्य आहेत ना , म्हणजे
कांदे मध्यम आकाराचे,
बटाटे मध्यम पेक्षा थोडे मोठे पण जास्त मोठे नको आणि त्याला डोळे नको,
टोमॅटो लालभडक नको,
कोथंबीरीला फुले नसावीत,
भेंडीच एक टोक तोडून कोवळी आहे ना बघणे
वगैरे सर्व सोपस्कार पार पाडून घरी परत आलो.
हातपाय धुवून जरा पेपर वाचायला घेतला तोपर्यंत "पुदिना कुठे आहे?" असा आवाज आला. मी चपापलो. चिठी शोधू लागलो. ती बाथरूममध्ये धुवायला टाकलेल्या प्यांटच्या खिशात सापडली. नीट वाचली, त्यात पुदिना नव्हता...तडक ती चिठी घेऊन अन्नपूर्णेसमोर उभा राहिलो, आणि खाली मान घालून सांगितलं "यात नव्हता लिहीलेला पुदीना"....
तिने शांतपणे चिठी घेतली, चिठीत "पाणीपुरीसाठी पुऱ्या" लिहिल्या होत्या, त्या मी आणल्याही होत्या. त्यावर बोटं ठेऊन देवी म्हणाली, "अहो, जरी लिहायच राहून गेेलं, तरी आज पाणीपुरी आहे तर पुदिना लागणार एवढ समजत नाही का महाशय?"..
या खटल्याचा निकाल आता मी तुमच्यावर सोपवतो ...😢
( हे कथेच्या नायकाचं स्वगत आहे, माझ्या आयुष्यात घडलेला प्रसंग नाही, हे आधीच क्लियर करतो. उगाच नंतर भांडण नको, आणि लागलं तर तुम्ही तेल ओतणारच, म्हणून हा खुलासा)
खाली टीप लिहावी लागली म्हणजे नक्कीच प्रसंग घडलेला आहे! 😆
ReplyDeleteगप की बाबा. का ऑनलाइन तेल ओतायलास ? ☺️☺️☺️
Deleteनाही रे, नाही घडली, पूर्णपणे काल्पनिक आहे 👍👍
भारी,घरोघरी हीच काल्पनिक कथा असते....काकडी , गवार मेथी तर झोप उडवू शकतात....अशा भाज्या कितीही यादीत लिहिलेल्या प्रमाणे असली तरी,...चांगली नव्हती म्हणून न आणली नाही तर बोलणी खावी लागत नाही....दोनतीन वेळा असे केले की...मग आपल्याला जावे लागत नाही...फार तर बरोबर पिशवी धरून मागे मागे जायचे.....फार तर आल गवती चहा, लिंबू ज्यात काही डोकं वापरायचे नसते हे घ्यायचे....आणि जर एकटं जाऊन आणायचा प्रसंग आला तर नेमून दिलेल्या भाजी विक्रेत्याकडून आणली असे सांगायचे...मग आपण safe...
ReplyDeleteआम्ही ह्या प्रसंगातून अजून जातोय...गेली 24वर्षे....सुटका नाही..😀😀
ReplyDelete