जादू......अगदी लहानपणीच आपण जादूचे प्रयोग बघितले असतील. एखाद्या जादूगाराने आपल्याला रिकाम्या टोपीतून जिवंत कबुतर किंवा ससा काढून दाखवला असेल, आपल्याला एक पत्ता काढायला सांगून, तो परत कॅट मध्ये ठेऊन, आपल्याला पिसायला देऊन, बरोब्बर परत काढून दाखवला असेल, आणि आपण एकदम आश्चर्यचकित किंवा अचंबित झालो असू.
मलाही अगदी लहणपणापासून या जादूने वेड लावले होते. आपल्यालाही काहीतरी जादू करायला यायला हवी म्हणून एक दोन हातचलाखी स्वरूपातल्या जादू मी शिकलोही होतो.
हल्लीच काही दिवसांपूर्वी परत काही जादूचे प्रयोग बघण्यात आले. आणि त्या विषयाचा थोडा अभ्यास चालू आला.
प्रत्येक जादूत एक किंवा जास्त method असतात, आणि शेवटी एक effect असतो. कबुतर टोपीतून निघणे हा effect, आणि ते कसं काढायचं ही method. मग ते जादूगाराने आपल्या नकळत त्याच्या अंगरख्याच्या खिशातून काढलं असेल किंवा बाहीतून. या झाल्या method. आपल्याला जादूगार method कधी सांगत नाही, फक्त effect दाखवतो, आणि ती method कळली नाही म्हणून आपल्याला मज्जा येते. Method समजली तर जादू जादू रहात नाही.
आता ती method आपल्याला समजली की आपल्याला कदाचित त्यातलं शास्त्र समजतं. पण नुसतं ते शास्त्र समजलं म्हणून आपल्याला ती करताच येईल असं नाही. कारण त्याशिवाय त्यात महत्वाची असते ती कला. आपण जी हातचलाखी म्हणतो त्याला slight of hand म्हणतात. अनेक प्रकार आहेत यात. काही गणित असत, काही तर्क असतात, काही विज्ञान असत, काहीवेळा तंत्राचा उपयोग होतो, पण ते सगळं करून दाखवणं यात लागते ती कला..
आपण ज्या इतर कलाकारांच्या कलेचा ज्यावेळी आस्वाद घेतो, त्यावेळी आपल्याला ते एक जादूगारच वाटतात. तोच कागद, तेच रंग आपल्याला दिले, आणि तंत्र शिकवले तरी आपण पिकासो सारखी कलाकृती नाही करू शकणार. Method माहिती असते, पण effect देता येत नाही, आणि तेव्हाही आपल्याला ती कलाकृती म्हणजे जादू वाटते.
इथे आपण बऱ्याच जादूगारांना बघतो. वाचतो. प्रत्येकाची method बऱ्यापैकी माहीत असते. तरी आपण त्यांनी लिहिलेल्या साहित्यातील effect ची जादू अनुभवण्यासाठी त्यांनी लिहिलेलं आवर्जून वाचतो.
गेल्या वेळी शास्त्रीय संगीताविषयी एक लेख लिहिला होता, त्या संगीतातही अशीच जादू असते. Method म्हणजे राग, सूर कळाले नाहीत तरी काही फरक पडतं नाही. त्यातल्या effect साठी आपण ते ऐकतो, आणि त्याच्या जादूने भारावून जातो.
आपल्या अवतीभोवती, घरात, बाहेर अश्या अनेक जादू होत असतात. कुणाला प्रेमात जादू दिसते, कुणाला कुठल्या खेळाडूमध्ये. कुणाला आपल्या जोडीदारात जादू दिसते तर कुणाला आणि कशात.
या जादूमय दुनियेचा मस्त आस्वाद घेत जगत राहिलं की आयुष्यातही खूप सुंदर जादू घडतात.
तुमच्याही आयुष्यात अशी काही जादू घडली असेल तर नक्की सांगा, आवडेल वाचायला...
छान
ReplyDeleteमस्त
ReplyDelete