मागवलेले बर्गर आणि पिझ्झा तर लगेच संपून जातात, पण मागे उरतात त्या त्यांच्यासोबत आलेल्या चीली फ्लेक्स, ओरेगानो हर्ब्ज वगैरेच्या श्याचेट.
त्या फ्रीजमध्ये ठेवल्या जातात, कधीतरी वापरू म्हणून, पण त्या वापरल्याच जात नाहीत. कधीतरी मग फ्रीज साफ करताना त्या सरळ टाकल्या जातात.
अश्या टाकावू गोष्टी नजरेस पडल्या आणि एक नवीन रेसिपी तयार झाली.
टिकावू झटका चटणी...
रेसिपी एकदम सोपी आहे.
१) त्या सगळ्या श्याचेट कापून त्यातील मसाले एका वाटीत एकत्र करायचे.
२) चवीपुरते मीठ घालायचं (ही इटालियन लोक अळणी खातात, त्यामुळे मीठ हवंच)
३) चिमुटभर साखर घालायची.
४) एका डावात चार चमचे तेल कडकडीत गरम करायचं, आणि ते गरम तेल मसाल्याच्या वाटीत ओतायच.
५) हवे असल्यास चमचाभर शेंगदाण्याच कूट घालायच, पण ते तेल थोडं थंड झाल्यावर बर, नाहीतर जा कूट.
झाली आपली टिकावू झटका चटणी तयार. आठवडाभर नक्की टिकते.
(आठवडाभर राहिलीच नाही, त्यामुळे महिन्याच टेस्टिंग नाही करता आले.)
अशी ही उपलब्ध साधनातून एका मिनिटात तयार झालेली चटणी कशी वाटली नक्की सांगा.
(ही वाटायला लागलीच नाही😂😂)
Comments
Post a Comment