सासुशी गट्टी : प्रास्ताविक

 



"सासु", आपल्या जीवनातील एक अत्यंत महत्वाचा विषय. ज्याला सासु कळली, त्याचे जीवन यशस्वी होईल यात शंका नाही. फक्त आपणच नाही तर आपल्या सासूला सुद्धा सासु कळली पाहिजे..

आता तुम्हीं म्हणाल, याचं काय डोकं फिरलंय काय? होय, फिरलंय...

वर्तमानपत्रात एक बातमी वाचली, आणि मन खिन्न झाले....





आता या बातमीचा सासुशी काय संबंध? आहे ना, सांगतो..

ही आपली सासु म्हणजे सायबर सुरक्षा...

आजच्या या स्मार्ट जगात आपल्या हाती मोबाईल, टॅबलेट , कॉम्प्युटर, स्मार्ट TV आहेत. उद्या internet of things मुळे तर आपल्या घरात फ्रीज, पंखा, इस्त्री, ओव्हन, दिवे, गाडी, शेगडी, दरवाजे जे मनात आणाल ते सगळं स्मार्ट झालेलं असेल. उद्याच उद्या , पण आजची ही मोबाईल , संगणक वगैरे आयुध आहेत, त्यांचा अत्यंत हुशारीने आणि जाणतेपणाने वापर केला गेला पाहिजे. नाहीतर याच गोष्टी आपल्या आयुष्यात काय त्रास करून ठेवतील सांगता येत नाही.

आणि मला हे लिहावं वाटतंय कारण गेलं एक दशकभर मी याच क्षेत्रात काम केलेल आहे. सायबर हल्ले किंवा माहिती सुरक्षा या विषयाशी संबंधीत सॉफ्टवेअर प्रणालीवर काम करणे हे माझे कार्यक्षेत्र. त्यातील अनुभवावरून मी हे नक्की सांगतो की तंत्रज्ञान कितीही प्रगत असेल तरी त्यातील अगदी वरवरचे बारकावे जाणून न घेता ते वापरणे यामुळेच आपले दैनंदिन गोष्टीमध्ये बरेच नुकसान होते.

यात सांगण्यासारखे बरेच आहे, आणि आपणा सर्वांना याची थोडीबहुत माहिती असेलच. तरीही केवळ कोरडी माहिती म्हणून न लिहिता काही प्रसंग अनुभवादाखल सांगून या मालिकेला कंटाळवाणे न करण्याचा विचार आहे...

दररोज एक प्रसंग आणि थोडा सासुविषयी बोध अश्या स्वरूपाची ही मालिका असेल..

आवडेल ना आपल्याला वाचायला?

भेटू लवकरच, आणि करू सासुशी गट्टी....

Comments

Post a Comment