नमस्कार मंडळी,
मागील भागात आपण फिशिंग बद्दल माहिती घेतली. आज आपण आपल्या सर्वांच्या एका अत्यंत जिव्हाळ्याच्या विषयावर माहिती करून घेणार आहोत.
गेल्या वर्षी एक दिवस तुफान पाऊस पडला. एका मोबाईल टेलिफोन कंपनीच्या सर्वर रूम मध्ये पाणी गेलं, आणि एका पुर्ण झोन ( चार पाच जिल्हे) मधील त्या मोबाईल कंपनीची सेवा पूर्ण दिवसभर बंद होती. रेंज नाही, आणि महत्वाचं म्हणजे डेटा connection नाही..
त्या दिवशी बरेच जण अस्वस्थ होते. पाच मिनिटात दहा वेळा रेंज आली का पाहत होते. मीही त्यातला एक होतोच. मोबाईलची सवय, त्यातली मानसिकता, त्याचे परिणाम हा या सासु मालिकेचा विषय नव्हे. मला बोलायचंय ते त्या डेटा नसल्याने आपल्या एवढ्या व्यथीत होण्याच्या मूळ कारणा विषयी, आणि ते म्हणजे आपली सोशल नेटवर्किंगची ऍप्स. इंस्टा, फेसबुक, व्हाट्सअप्प...
असाच एक घडलेला किस्सा सांगतो...
कामिनीताई दर अर्ध्या तासाने आपण काय करतोय ते चेहरापुस्तकावर (म्हणजे FB) लिहीत असत, फोटो टाकत असत. असेच एक दिवस त्यांच्या मैत्रिणीच्या मुलीचा साखरपुडा होता दिल्लीला. जायचं आहेच तर आणि थोडं फिरून येऊ म्हणून त्यांनी चांगला दहा दिवसाचा प्लॅन केला. फेसबुक वर लगेच प्लॅन जगजाहीर झाला...
"गोइंग टू दिल्ली फॉर पिंकीज एंगेजमेंट ऑन ट्वेंटी फर्स्ट, विल बी बॅक इन बंगलोर ऑन थरटी फर्स्ट...विल मिस यू बंगलोर" ....
हा मेसेज त्यांनी अगदी दहा तारखेलाच टाकला होता....
मग एकवीस ला सकाळी परत मेसेज ची साखळी चालू झाली...
लेफ्ट फ्रॉम होम.....
ओला केम इन टाइम........OMG!
धिस ट्राफिक इन बंगलोर इज टू मच.....
At last , रीचड एअरपोर्ट......
चेक्कड इन....
security चेक डन......
बोर्डेड..........
लँडेड...
मग त्या साखरपूड्यातले स्टेटस, मग त्या आग्रा वगैरे फिरून आल्या त्यावेळचे स्टेटस..
मग एकतीस ला परत.....
लेफ्ट फ्रॉम हॉटेल.....
ओला केम इन टाइम........OMG!
धिस ट्राफिक इन दिल्ली इज टू मच.....
At last , रीचड एअरपोर्ट......
चेक्कड इन....
security चेक डन......
बोर्डेड..........लँडेड.......
ओला टूक फिफटीन मिनिट्स 😢.......
ट्राफिक इन दिल्ली वॉज बेटर......
घराचे दार उघडण्याआधीचा स्टेटस , "होम स्वीट होम" असा टाकून कामिनीताईंनी दार उघडले, अन घरातील सगळया मौल्यवान वस्तू गायब होत्या....
काय झालं असेल ते तुम्ही ओळखलं असेलच. कामिनीताईची ही सोशल सवय चोरांनी हेरली होती. एकवीस तारखेचा "बोर्डेड" हा मेसेज आल्यावर त्यांनी कमिनीताईंचे घर गाठले...ते चोर दहा दिवस त्यांच्या घरातच रहात होते... आणि त्यांचा बंगलोर मध्ये लॅन्ड झाल्याचा मेसेज वाचल्यावर त्यांनी सामानाचे गाठोडे बांधून पलायन केले.....
अश्या प्रकारच्या गोष्टीना आम्ही सोशल इंजिनियरिंग अटॅक म्हणतो. कमिनीताईंच्या घरी भौतिक गोष्टींची चोरी झाली..सोशल नेटवर्क वरील आपल्या पोस्ट मुळे आपली बरीच वैयक्तिक माहिती सर्वाना समजते. आपला जन्मदिवस, आपल्या गाडीचा नंबर, आपल्या मुलांचे नाव सगळं सगळं सगळयांना कळतं...
याच आपल्या पर्सनल माहितीचा वापर करून सायबर चोरटे आपले पासवर्ड गेस करतात. आपल्या माहितीचा उपयोग करून दुसऱ्या कुणालातरी फसवतात...
काय शिकलो आपण यातून?
सोशल ऍप्स जरूर वापरा, पण आपली पर्सनल माहिती किंवा घटना त्यावर प्रक्षेपित करताना जरा सांभाळून, इतकंच....
चला तर मग, भेटू परत पुढच्या भागात...

खुप छान....!!
ReplyDelete