नमस्कार मंडळी,
मागील भागात आपण फसवणूक करणारे आपल्याला मदत करण्याच्या बहाण्याने आपल्या फोन वर स्क्रीन शेअरींग ॲप इन्स्टॉल करायला लावून, आपल्या फोनचा कंट्रोल घेउन आपल्याला कसे लुबाडू शकतात हे पाहिले.
आजच्या भागात आपण रिडीम पॉइंट्सच्या लोभाने आपण फसवणुकीला कसे बळी पडू शकतो ते पाहूया.
त्याचं काय झालं, शालिनीताई भरपूर ऑनलाइन शॉपिंग करत. त्यातुन त्यांना काही ऑफर किंवा पॉईंट मिळत, कधी बँकेकडून, कधी ॲप कडून, कधी दुकानाकडून. अश्या मिळालेल्या पॉईंट ना रीडीम करून काही मिळालं, की त्यांना फुकट खरेदी केल्याचा आनंद मिळत असे.
एकदा त्यांना एक sms आला, की त्यांचेन 72567 पॉईंट्स झाले आहेत, आणि ते दोन तीन दिवसात expire होणार आहेत. SMS मध्ये एक लिंक होती. त्यांनी ती click करुन विचारलेली माहिती भरली. एक दोन प्रॉडकट निवडले, आणि फुकट काहीतरी मिळाल्याच्या आनंदात रममाण झाल्या.
नंतर काही वेळाने त्यांचं खात रिकाम झालं होतं.
हे कसं झालं?
बघा हा असा येतो sms
यातील लिंक click केली की असे पेज येते
इथे त्यांनी ई-मेल adress आणि "पासवर्ड" तसेच क्रेडिट कार्डची सर्व डिटेल्स विचारली आहेत.
Reward किंवा रेडिम पॉईंट ला कशाला हवेत डिटेल्स?
ते सोडा, कुठल्याही साइटवर ई-मेल पासवर्ड द्यायचा नाही किन्वा credit कार्ड ची माहिती द्यायची नाही , हे साधं आपल्याला त्या "फुकट मिळतंय, किंवा स्कीम चांगली आहे" च्या नादात कळत नाही.
अश्या कुठल्याही पेज वर आपली माहिती देऊ नये !!
सावध रहा !!
(क्रमशः)
Comments
Post a Comment