सासुशी गट्टी : सासूची उजळणी आणि समारोप 🙏



नमस्कार मंडळी,

आजपर्यंतच्या भागात आपण सासुचे अनेक रंग बघितले. सासुला समजून घेऊन जर आपण आपले डिजिटल आयुष्य जगलो तर या डिजिटल युगाचे फायदे मिळतील. पण सासुकडे दुर्लक्ष करून काही करत राहीलो तर कधी फटका बसेल सांगता येत नाही.

आजपर्यंतच्या भागातील किस्से वाचून तुम्हापैकी काही जण कदाचित घाबरले असतील. या मालिकेचा उद्देश भीती घालण्याचा नसून जागृती निर्माण करण्याचा आहे. फक्त आतापर्यंतच्या भागांत सांगितलेल्या काही सोप्या युक्त्या, सूचना लक्षात ठेऊन त्याप्रमाणे काळजी घेतली तरी बास आहे. 

हा या मालिकेचा अंतिम भाग, आणि या भागात उजळणी म्हणून काही सूचना लिहीत आहे. पुनरावृत्ती वाटली तरी नक्की वाचा.

१) पासवर्डमध्ये आपले नाव, वाढदिवस, गाडीचा नंबर असे काही नको.
२) पासवर्ड तीन महिन्यातून एकदा बदला. पासवर्ड कसा ठेवावा यासाठी दुसरा भाग वाचा..
३) ई-मेल वर अनोळखी व्यक्तीकडून आलेल्या ई-मेल, sms मध्ये काही लिंक असेल तर ओपन करू नका. केलीच तर त्यात आपला युजर आयडी पासवर्ड विचारला असेल तर अजीबात देऊ नका
४) कोणतेही ऍप डाउनलोड करताना त्याच्या परमिशन्स वगैरे पाहून इन्स्टॉल करा
५) आपली OTP कुणालाही शेअर करू नका
६) मुलांना मोबाईल किंवा टॅबलेट देताना त्यांना सासुची ओळख करून द्या आणि सांगा की कॉल किंवा चॅट वर कोणतीही माहिती पुरवायची नाही.
७) गेम वगैरे शक्यतो ऍड फ्री करून घ्या (फुकट तिथे जास्त धोका)
८) सोशल साइट वर वैयक्तिक पोस्ट टाकताना त्यावर अशी माहिती टाकताना नीट विचार करून टाका.

९) लॉटरीचे बक्षीस, कमी व्याजात कर्ज, जास्त फायदा देणाऱ्या गुंतवणूक स्कीम, जुन्या पॉलिसीचे हफ्ते थकल्याने पॉलिसी बंद पडेल व लगेच काही रक्कम भरली तर पूर्ववत होईल अश्या प्रकारच्या कॉल पासून सावध राहावे

सावध रहा, सतर्क रहा..

आता एक मागणी..तुम्हाला ही मालिका जर आवडली असेल तर केवळ आणखी जास्त लोकांना ही माहिती कळून त्यांच्यातही जागृती व्हावी या हेतूने ही मालिका जरूर शेअर करा.....

सासुचे आणखी गहरे रंग आहेत, त्याविषयी सुचेल तसे लिहीनच. आपल्या आजूबाजुला घडलेल्या या बाबतीतल्या काही घटनांविषयी शंका असेल तर मेसेज करा ..

आतापर्यंत दिलेल्या प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद...🙏


Comments

  1. मस्त तेजस

    ReplyDelete
  2. खूपच छान होती ही सासुशी गट्टी मालिका, अगदी सहज सोप्या आणि सुटसुटीत भाषेत समजले अशी

    धन्यवाद तेजस लिमये

    असेच सुंदर सुंदर लेखन आपण लिहीत राहावे आणि आम्ही त्याचा आस्वाद घेत राहो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

    ReplyDelete
  3. Thank you sir for this eye-opening blog.

    ReplyDelete

Post a Comment