का बरं हा लिहितोय?

नमस्कार मंडळी ! 

गेल्या काही वर्षात खूप जणांनी मला लिहिणे चालू कर अशी आज्ञेवजा विनंती केली. आज उद्या करत करत मुहूर्त काही सापडत नव्हता. अचानक काही दिवसांपूर्वी ज्या गोष्टी करायच्या ठरवल्या आहेत ; पण अजून चालू केल्या नाहीत यांची यादी करत बसलो होतो. यादी मारुतीच्या शेपटीप्रमाणे वाढत चाललेली बघून असा संकल्प सोडला कि यातली एकतरी गोष्ट चालू करायची .. आणि त्यामुळे तुम्हा सर्वाना ही शिक्षा !!

असो - 

अजूनही वाचताय म्हणजे खरंच तुम्ही मला खूप जवळचे आहात. या भावनेनेच लाईक किंवा फॉलो करायला हरकत नाही. कन्टेन्ट वाचूनच प्रतिक्रिया देणार असं असेल तरी हरकत नाही. तुमचे कष्ट थोडे कमी करावेत म्हणून अनुक्रमाणिकेच्या रूपात या ब्लॉगवरील लिखाणाची यादी खाली आहेच .. 

अभिप्राय नक्की कळवा,

तेजस दिगंबर लिमये  

पोस्टची लिस्ट 

मराठी काव्यरूपी अथर्वशीर्ष  

एक अवलिया ( कै. डॉ. मधुसूदन सोमण , मिठबांव यांना श्रद्धांजली)    

ड्रायव्हरचा पगार - माझ्या आयुष्यात घातलेली एक मजेशीर घटना 

बंधन - माझी खूप  आधी लिहिलेली पहिली कथा 

गिरणीवाले मामा 

मनाचे आयसोलेशन 






Comments

Post a Comment