दिशा

दिशा 





लहानपणी एक खेळ खेळायचो आम्ही . ज्याच्यावर राज्य असायचं; त्याच्या डोळ्यावर रुमाल बांधला जायचा. कोणीतरी त्याला अजिबात दिसत नसल्याची खात्री करून घेत असे. कोणी दुसरा त्याला गोल गोल फिरवित असे.  नंतर त्याला जवळच्याच एका वस्तूला शिवण्यास सांगितलं  जायचं. ती वस्तू असायची एका बाजूला; आणि हा नेमका शोधणं चालू करायचा दुसऱ्याच बाजूला. खूप मजा यायची ही गंमत बघायला. दिशा माहित नसल्यामुळे भरकटला जायचा गडी. 


आज बरेच दिवसांनी तो खेळ आठवला. कारण मी सुद्धा असाच भरकटत होतो. नक्की काय करावं, कसं करावं, कधी करावं, काहीच कळत नव्हतं.  याची कारणं पण कळतं नव्हती.  अचानक या खेळाची आठवण झाली;

आणि कळालं की आपण  “दिशा”  विसरलो आहोत.


बऱ्याचं वेळा असं होतं. आपण आपल्या आयुष्यातल्या दिशांचं योग्य मोजमाप करत नाही. मग आपल्यालाच कळत नाही की नक्की काय करायच?  पण या दिशा ठरवायच्या तरी कशा? त्याचं मोजमाप तरी कस करायचं?  वाटतं तितकं सोपं नाहीये ते. पण अवघडही नाहीये.


जीवनातल्या दिशा ठरवण्यासाठी लागतात ती स्वतः ठरलेली परिमाणं; स्वतःच्या सुखा-समाधानाच्या व्याख्येची. ज्याला समजतं  की स्वतः सुखी कसा होऊ शकतो; त्याला दिशा ठरवणं पटकन जमून जात.


आणखी एक गोष्ट!  दिशांना लांबी, रुंदी नसते. त्या मोजता येत नाहीत.  त्या फक्त मार्ग “दर्शिका” असतात.  आपण फक्त योग्य मार्गावर योग्य दिशेला असलं पाहिजे. सकाळी सूर्य दिशा दाखवतो. आणि रात्री ग्रह-तारे.  त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यातही काही पथदर्शक, मैलाचे दगड ठेवणे गरजेचे आहे.


बघा प्रयत्न करून दिशा ओळखण्याच्या!  नक्की समाधानी व्हाल! 


Comments

  1. अप्रतिम। तुझे खूप खूप अभिनंदन हा blog सुरू केल्या बद्दल।

    ReplyDelete
    Replies
    1. मित्रा, तू काल व्हाट्सअँप स्टेटस वरील कथा वाचल्यावर हि ब्लॉग ची कल्पना सुचवलीस , याचे सर्व श्रेय तुलाच ! धन्यवाद.

      Delete
  2. मार्मिक कथा, सुंदर

    ReplyDelete
  3. खूप सुंदर...तुझी प्रतिभा अशीच उजळत राहो..आम्हाला असेच छान वाचनीय लेख वाचायला मिळोत..All the Best

    ReplyDelete
  4. छान...बालपण आठवले... छान व्यक्त होता तुम्ही...
    असेच लिहित रहा खूप खूप चांगला वाचण्याची इच्छा व खूप शुभेच्छा

    ReplyDelete
  5. सुंदर लिहलाईस ब्लॉग... असच लिहित रहा..

    ReplyDelete
  6. खर आहे...अतीशय सुंदर...

    ReplyDelete
  7. खुप छान आयुष्यात दिशा असणे खुप महत्वा चा आहे

    ReplyDelete
  8. खुप छान आयुष्यात दिशा असणे खुप महत्वा चा आहे

    ReplyDelete
  9. लिखाण योग्य दिशेने चालू आहे ,,👌

    ReplyDelete
  10. very beautiful!...also sun and stars really shows how we may need a different guide or guidance for both good and bad times.

    ReplyDelete
  11. Atta मलाही योग्य दिशा मिळाली असे वाटते.

    ReplyDelete

Post a Comment