।। काव्यरूपी मराठी श्री गणपती अथर्वशीर्ष ।।
।। श्री ।।
प्रारंभी वंदुनी गणेशा, कार्य हे आरंभितो ।
गणकऋषी तुम्हांही वंदन, अथर्वशीर्ष अनुवादितो ।। १।।
ब्रह्मतत्त्व साक्षात तू, सृष्टीचा निर्माता तू ।
पालनपोषण कर्ता तू , तसेच मोक्षदाता तू ।।२।।
चराचरी या वसशी तू, सर्वव्यापी परब्रह्म तू ।
यथार्थ सत्य स्मरणीय नित्य , अविनाशी परमात्मा तू ।।३।।
मम वाणी नित्य करूदे तुझेच रूपवर्णन रे ।
श्रवणी सदा नित्य पडूदे तुझ्या गुणांचेच भजन रे ।।४।।
करीन मी जे दान सदैव, ते तुझ्या भक्तीचे रे ।
साध्य होई जे जे मजला ते ते तुझ्या कृपेने रे ।।५।।
नित्यपठण कुणी या स्तोत्राचे पूर्ण भक्तीने करतील रे ।
शिष्य मानुनी त्या सर्वांचे, सदैव करशी रक्षण रे ।।६।।
पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर आसमंतातूनही रे ।
येता संकट कधीही अचानक करी निवारण त्यांचे रे ।।७।।
वाणी ज्ञान हर्षात तू सर्वव्यापीही असशी तू ।
सच्चिदानंदSस्वरूपी अद्वितीय परब्रम्ह तू ।।८।।
सृष्टी निर्मिली तुझ्यातूनी अन् तूच तिचा तारकही रे ।
अंत जरी करशील तिचा तरी तुझ्यातचि ती विरेल रे ।।९।।
पृथ्वी जलाग्नी आकाश वायू पंचतत्त्व प्रतिरूप तू ।
परापश्यन्ति मध्यमावैखरी वाणींची या स्फूर्ती तू ।।१०।।
तम रज सत्व त्रिगुण वा स्थूलसूक्ष्मानंदी देह रे ।
भविष्य भूत वर्तमान सर्वांच्या तू पार रे ।।११।।
जागृत स्वप्न असो वा निद्रा मूलाधारी वसशी तू ।
जारक तारक मारक तूचि ध्यानमूर्ती योग्यांची तू ।।१२।।
ब्रम्हा विष्णू रुद्र आणखी इंद्र अग्नी वायुहि तू ।
सूर्य चंद्र हि तुझीच रूपे त्रिलोकींचा ओंकार तू ।।१३।।
गकार हा पूर्वरूपी अकार मध्यम नंतर हो ।
चंद्रबिंदू हा अंतरूपी तारस्वरे साधावा हो ।।१४।।
🕉 गँ गणपतये नमः गणक ऋषींनी रचिलेला।
निचृद्गायत्री साधला छंद वंदूनि पदकमला ।।१५।।
एकदंती चतुर्भुजी वक्रतुंडरूप अलौकिक ।
निज ध्यानीमनी असू दे हीच प्रार्थना मम एक ।।१६।।
अतीव सुंदर रूप शोभते पाशांकुश दो हाती असे ।
दंत धरुनी एके हाती चतुर्हस्ती वरदान वसे ।।१७।।
ज्ञानवंत मूषकासनी तू शूर्पकर्णी रक्तवर्णी तू ।
रक्तरंगी वस्त्रांनी सजला लंबोदर साजिरा तू ।।१८।।
रक्तचंदनी गंध लावूनी पूजिती रक्तफुलानी तुला ।
कृपादृष्टी तव भक्तांवरती तारीसी साऱ्या जगताला ।।१९।।
सृष्टीआधी प्रकृतीपुरुष जग हे सारे निर्मीयले ।
भक्तकृपाळु गणेश चिंती योगी तोचि श्रेष्ठ असे ।।२०।।
व्रातपती शिवसुता तुजला विश्वतारण्या प्रार्थना ।
चरणकमली मी करितो वंदन विघ्ननाशका गजानना ।।२१।।
- तेजस दिगंबर लिमये
_______________________________________________________________________________________
चालीसाठी संदर्भ
मस्त!
ReplyDeleteNice
ReplyDeleteखूपच छान.....धन्यवाद
ReplyDeleteवा!खूपच छान जमलंय!👍👌
ReplyDelete🙏🙏👌👌
ReplyDeleteखूपच सुंदर ����
ReplyDeleteToo Good
ReplyDeleteVery good
ReplyDeleteVery good
ReplyDeleteखूप छान
ReplyDeleteNew perspective. Nice
ReplyDeleteखूपच सुंदर. शब्दांची पेरणी अगदी छान झाली आहे त्यामुळे हे काव्यरूपी अथर्वशीर्ष देखील तितकेच मधुर वाटते आहे.
ReplyDeleteधन्यवाद अमित !
Deleteव्वा खुपच सुंदर
ReplyDeleteअप्रतिम सुंदर सर
ReplyDeleteसुंदर, धन्यवाद तेजस जी 🙏
ReplyDeleteFeeling very relaxed and can feel the divinity in this
ReplyDeleteसुंदरच, प्रतिलीपी वर पोस्ट करावे
ReplyDelete